व्याप्ती

[masterslider alias=”ms-7″]

मूल्यवर्धनची व्याप्ती

शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने ‘मूल्यवर्धन’ हा कार्यक्रम महाराष्ट्र, गोवा आणि देशभरातील अनेक खासगी शाळांमध्ये राबविला जात आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात ४०२३१ शाळांमध्ये ११५१२६ शिक्षकांपर्यंत आणि २२६५२४९ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. गोवा राज्यात ७५० शाळांमधील १२१६ शिक्षकांपर्यंत आणि २०८३२ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. खासगी १९० शाळांमधील ७८२ शिक्षकांपर्यंत आणि ३६६७३ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.

कार्यपद्धती

महाराष्ट्र व गोव्याच्या सर्व सरकारी प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन राबविण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने शासकीय शिक्षकांमधूनच प्रशिक्षकांचा (प्रेरकांचा) मोठा गट (सुमारे ८००० प्रेरक) तयार केलेला आहे.

  • पहिल्या टप्प्यात एसएमएफच्या मास्टर ट्रेनर्सद्वारे निवडलेल्या या प्रेरकांना तालुका पातळीवर ४ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.
  • त्यानंतर ते प्रेरक स्वतःच्या शाळेत मूल्यवर्धन उपक्रमांचा सराव करतात.
  • मूल्यवर्धन प्रशिक्षण सामुग्रीचा परिचय करून घेण्यासाठी एसएमएफने आयोजित केलेल्या २ दिवसीय कार्यशाळेत सर्व प्रेरक सहभागी होतात.
  • अशाप्रकारे त्यांची क्षमता विकसित झाल्यानंतर ते आपापल्या केंद्रांमधील शिक्षकांसाठी केंद्र पातळीवर ४ दिवसीय कार्यशाळा घेतात.
  • ३१ मे २०१९ पर्यंत महाराष्ट्रामध्ये सुमारे १०१७२५ शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण दिले गेले आहे. तसेच गोवा राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये १२१६ प्राथमिक शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण दिले गेले आहे.

प्रशिक्षणाच्या या विशिष्ट पद्धतीमुळे मूल्यवर्धन खूप झपाट्याने लाखो मुलांपर्यंत पोहोचविले जात आहे.

MV_Implementation